हल्लेखोरांचा बंदोबस्त करा : राज ठाकरे   

मुंबई, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. केंद्र सरकारने हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की, या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडायला हवा. १९७२ मध्ये म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळेस इस्रायली खेळाडूंवर पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी हल्ला केला. यानंतर इस्रायलने या अतिरेक्यांना आणि हल्ल्याच्या सूत्रधारांना अशा पद्धतीने मारले होते की, पुढे दीर्घकाळ पॅलेस्टिनी लोकांच्या मनात दहशत बसली होती. भारताचे आणि इस्रायलचे संबंध उत्तम आहेत.

राजकीय पक्षांकडून निषेध 

मुंबई, (प्रतिनिधी) : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये  दहशतवाद्यांनी निरपराध पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याचा  काँग्रेस आणि भाजपने बुधवारी निषेध केला. या घटनेच्या निषेधार्थ प्रदेश काँग्रेसने बुधवारी दादरमध्ये मोर्चा काढला. तर भाजपच्या मुंबई अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने प्रदेश कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या  टिळक भवन येथे पहलगाम हल्ल्यातील मृतांना दोन मिनिटे मौन राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  त्यानंतर मोर्चा काढण्यात आला. 
 

Related Articles